सोलापूर शहरातील बौद्ध विहार एक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा प्रस्तुती प्रोफेसर डॉक्टर संघ प्रकाश दुड्डे
सोलापूर शहरातील बौद्ध विहार : एक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा -प्रो. डॉ.संघप्रकाश दुड्डे सोलापूर
सोलापूर शहराला बौद्ध धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील बौद्ध विहार केवळ पूजास्थान नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जिवंत प्रतीक म्हणूनही ओळखले जातात. या लेखात सोलापूर शहरातील बौद्ध विहारांचा इतिहास, निर्मिती, व्यवस्थापन आणि तेथे साजरे होणारे विविध कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
अस्थि विहार
सोलापूर शहरातील बौद्ध विहारांचा इतिहास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. सोलापूर शहरातील मिलिंद नगरीतील अस्थि विहार या विहाराची स्थापना इ.स. १९५६ मध्ये झाली. हा विहार मिलिंद नगर, बुधवार पेठ येथे आहे.
या विहाराचे महत्त्व अधिक असण्याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई आणि सोलापूर अशा तीन ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन दिवसांनी त्यांच्या अस्थी सोलापूरमध्ये आणण्यात आल्या होत्या. त्यासाठी भैय्यासाहेब आंबेडकरांनी परवानगी दिली होती. अस्थी आणल्यावेळी रेल्वे स्टेशनवर २५ ते ३० हजार लोकांच्या उपस्थितीत बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली.
सुरुवातीला हा विहार लहान होता. मात्र, २००२ मध्ये विहाराच्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात आले आणि २०१२ मध्ये ही इमारत दोन मजली करण्यात आली. आज या विहारात चांदीच्या कलशात बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. विहारात बाबासाहेबांची प्रतिमा व भगवान बुद्धाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. विहाराच्या भिंतींवर बाबासाहेबांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सुंदर कोरीव कामातून दाखवण्यात आले आहेत.
विहार व्यवस्थापन
सोलापूर शहरातील बौद्ध विहारांचे व्यवस्थापन विविध समित्या आणि संस्थांमार्फत केले जाते. उदाहरणार्थ, नालंदा नगर बुद्ध विहारचे व्यवस्थापन बुद्ध विहार समिती करते. या समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे आहेत.
मिलिंद नगर बुद्ध विहार समिती सोलापूर
या विहाराचे देखील गेल्या 40-50 वर्षापासून मोठ्या जोमाने बौद्ध पद्धतीने बौद्ध धम्माच्या अनुषंगाने दर पौर्णिमेला बुद्ध पूजेचे आयोजन केले जातं वर्षावासाचे प्रोग्राम कार्यक्रम या ठिकाणी होतात या ठिकाणचे बौद्ध उपासक शिंदे गुरुजी त्याचप्रमाणे ताराबाई रणशृंगारे यांच्या प्रयत्नातून धम्म चळवळ मोठ्या जोमाने त्या ठिकाणी सुरू आहे आज देखील या ठिकाणी भदंत बी सारीपुत्र हे वास्तव्यास असून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठमोठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात सध्या याही विहाराचं पुनर्निर्मांच काम नगरसेवकांच्या वतीने सुरू आहे
बौद्धांचा दानमय बुद्ध विहार न्यू बुधवार पेठ आंबेडकर नगर सोलापूर
बौद्धांचा दानमय बुद्ध विहार सोलापूर शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा बुद्ध विहार मानला जातो सध्याचे अध्यक्ष अँड शताब्दी कुमार मधुकर दोडायानुरू हे आहेत या ठिकाणी पूज्य भदंत युनंदीया महास्थवीर यांनी या विहाराच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी ब्रह्मदेशातून भगवान बुद्धांची भूमी स्पर्श मुद्रा असलेली मूर्ती या ठिकाणी दिलेली आहे या व्यवहाराची निर्मिती करण्यासाठी तत्कालीन बौद्ध उपासकृ,उपासीका यांनी फार मोठे योगदान दिलेला आहे त्यामध्ये डी एस चंद्रमोरे , लोकाप्पा दोडायानूर, नामदेव सातपुते,मारुती दुड्डे ,दि नी माने ,डी आर गायकवाड ,प्रल्हाद चंदनशिवे , इराप्पा चन्नाप्पा इंगळे ,शंकर शिवशरण ,विठाबाई शिवशरण,केशरबाई कांबळे, ए टी दावणे ,कल्लाप्पा शरणाप्पा शिवशरण गुरुजी, बाबुराव टेकाप्पा चौधरी इत्यादी अनेक वध उपासक उपासिका याने आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे एकाच ठिकाणी पूज्य भदंत शीलरतन महास्थवीर हे देखील अशोक चौकातील बुद्ध विहारांमध्ये 35 ,40 वर्ष वास्तव्य करून या दोन्ही विहारांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण करण्याचे काम श्रामनेर शिबिर ,वर्षावास त्याचप्रमाणे दर पौर्णिमेचे कार्यक्रम यामध्ये आयोजित केले जात असतात बाहेरील वक्ते बोलावून त्यांचे व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजित केले जातात दर पौर्णिमेला परित्राण पाठाचे पठण सामूहिक रित्या केले जाते त्यामुळे पाली गाथांचा पठण या ठिकाणी केले जाते सातत्याने सुरू आहे सध्या या विहाराचं नूतनीकरण नगरसेविका वंदना गायकवाड ,अजित भाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नातून विहाराचे पुनर्निर्मान मोठ्या जोमाने सुरू आहे
बुद्ध नगर फॉरेस्ट बुद्ध विहार
बुद्ध नगर फॉरेस्ट या ठिकाणी देखील गेल्या 50 -60 वर्षापासून नियमित प्रमाणे बौद्ध धम्माचे कार्यक्रम नित्यनेमाने चालू राहतात या ठिकाणचे दिवंगत भाऊसाहेब नागटिळक , ग .ल.सोनवणे यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये धम्माची क्रांती या उपासक उपासिकेने केलेली आहे त्याचप्रमाणे दत्ता गायकवाड डॉ अशोक गायकवाड याही लोकांचे योगदान या विहाराच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून सध्या या विहाराचे कामकाज विश्वास नागटिळक ,सिद्धार्थ जाधव आणि त्या ठिकाणची तरुण मंडळी मोठ्या जोमाने करत आहे याविषयी अभिमानाची गोष्ट या ठिकाणी लहान मुलांसाठी बाल संस्कार केंद्र देखील चालवले जातात
याशिवाय, सोलापूरातील बुद्ध विहारांमध्ये समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिरे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम, तसेच इतर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. हे कार्यक्रम सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचा संदेश देतात.
वेळूवन बुद्ध विहार सोलापूर
सोलापूर शहरातलं जेवण बुद्ध विहार हे असं ठिकाण आहे या ठिकाणी सोलापूरचे धम्म गुरु भदंत एस परमशांती महास्थवीर यांचे वास्तव्य या ठिकाणी लाभलेला आहे त्याने सोलापूर शहरांमध्ये पहिला प्रथम बौद्ध धम्म दिक्षेचा सोहळा घडवून आणलेला होता 1956 चा नंतर बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी सोलापूर धारवाड कर्नाटक बेंगलोर तथा अन्य ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी केलेला त्याचप्रमाणे या सोसायटीमधील उपासक उपस्थित केला धम्माचे संस्कार लावण्याचे काम देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणीच भाऊ टाकपेरे, अंबादास कदम, याच ठिकाणचे रहिवासी भदंत राजरतन महास्थवीर यांनी धम्म दीक्षा घेऊन बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रसारमाध्ये संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशभर धम्माचं काम करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे
सिद्धार्थ बुद्ध विहार सोलापूर
सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या स्थापनेमध्ये तत्कालीन कलेक्टर रत्नाकर गायकवाड यांनी फार मोलाचे योगदान देऊन या विहाराची निर्मिती केलेली आहे या विहाराच्या मधूनच आज थायलंडची बुद्धमूर्तीबघायला मिळते या ठिकाणचे उपासक पोद्दार काका ,तेनाळीकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचा आहे
सिद्धार्थ बुद्ध विहार अमराई जुना देगाव नाका सोलापूर
सिद्धार्थ बुद्ध विहार या ठिकाणी देखील नित्यनेमाने बुद्ध पूजा वर्षाचा कार्यक्रम श्रामनेर शिबिर हे घेतले जातात या ठिकाणच्या उपासिका पूर्वाश्रमीच्या शारदाताई गोरख गायकवाड यांनी भिक्षणी बनवून अंगावर शिवर धारण करून संपूर्ण जीवन त्यागमय जीवन जगण्याचा एक आदर्श घालून दिला संपूर्ण महाराष्ट्र अमरावती नागपूर पुणे वर्धा लातूर या ठिकाणी त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत विपश्यना ध्यान साधना सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या शिबिरामध्ये अनेक शिबिरामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि आज त्या भिक्षणी धम्मचारणी या नावाने ओळखल्या जातात अशा त्यागी भिक्षणी या सिद्धार्थ बुद्ध विहार अमराई येथून सोलापूर शहरालाच नव्हे तर महाराष्ट्राला एक भिक्षणी त्यागी भिक्षणी मिळाली आहे
मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर बुद्ध विहार सोलापूर
या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती झालेली असून येथे पूज्यबदंत धम्मघोष महाथेरो अनेक वर्षापर्यंत त्याने येथील भिक्षणीवासामध्ये राहून लोकांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे यामध्ये त्यांना सहकार्य करण्याचे काम प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा शाखा रमाबाई आंबेडकर नगर च्या उपासीका केंद्रीय शिक्षिका धम्मरक्षीता कांबळे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य अण्णासाहेब वाघमारे यांनी पर्यटनाचे माध्यमातून गेली 40 वर्षे लोकांना बौद्ध तीर्थस्थानांना नेऊन तेथील बौद्ध संस्कृतीची ओळख त्याचप्रमाणे बौद्ध संस्कार श्रामणे शिबिर बौद्धाचार्य शिबिर उपासिका शिबिर बौद्ध महासभेने दिलेले सर्व 28 प्रकारचे शिबिर या ठिकाणी राबवले जातात बौद्ध धम्माच्या नीतीने माणसं पालन करण्याच्या दृष्टीने यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे
मुकुंद नगर बुद्ध विहार सोलापूर
भवानी पेठ सोलापूर या ठिकाणी मुकुंद नगर बुद्ध विहाराची स्थापना मोठ्या थाटामाटा मध्ये करण्यात आलेली आहे या ठिकाणी दोन मजली बुद्धविहाराची निर्मिती केलेली असून या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचे संस्कार मुलांवर केले जातात मुलांना आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी जिम तालीम या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात डी के बॉस करतात दशरथ कसबे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महत्त्वाचे कार्यक्रम शिबिरे आरोग्य शिबिरे जनतेच्या कल्याणाचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात
जीएम संस्था संचलित बुद्ध विहार मिलिंद नगर सोलापूर
सोलापूर शहरातील प्रमुख भागात अर्थात मिलिंद नगर परिसरामध्ये जीएम संस्था या माध्यमातून बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली असून या विहाराचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि त्यांची सर्व सहकारी मिळून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने दिव्य भव्य मिरवणूक काढली जाते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आकर्षक डिझाईन आकर्षक मिरवणूक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लेझीम ताफा काढला जातो हजारो विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीमध्ये लेझीम खेळतात ही एक आगळी वेगळी पद्धत ओळख जीएम संस्थेने निर्माण केलेली आहे त्यांच्या विहारांमध्ये भगवान बुद्धांची ध्यान अवस्थेमध्ये बसलेली सहा फुटाची दिव्य आणि भव्य बुद्धमूर्ती आपल्याला बघायला मिळते मन प्रसन्न होते या मूर्तीकडे बघून आत्मिक शांती प्राप्त होते
प्रबुद्ध भारत तरुण मंडळ संचलित बुद्ध विहार मिलिंद नगर
प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या विद्यमाने बुद्ध विहाराची निर्मिती केली असून माजी नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम या बुद्ध विहारांमध्ये केले जातात बुद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने फार मोठा लेझीम ताफा काढला जातो यामध्ये हजारो विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम लोकांना घेऊन लोकांच्या हितासाठी कल्याणसाठी ते सतत प्रयत्नशील असतात वेगवेगळ्या कलाकारांना बोलावून त्यांच्या कलांना संधी देण्याचे काम ज्यामध्ये आनंद शिंदे कडूबाई खरात चंद्रकांत शिंदे आदी कलाकारांना बोलावून त्यांचा मानसन्मान आनंद दादा चंदनशिवे यांच्याकडून केला जातो
बुद्ध दर्शन तरुण मंडळ संचलित बुद्ध विहार मिलिंद नगर
बुद्ध दर्शन तरुण मंडळ या मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक रवी बॉस गायकवाड यांच्या सम्यक विचाराने सोलापूर शहरांमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लेझीम तात्या ची सुरुवात याच मंडळाने केली आणि इतर मंडळांना आदर्श घालून दिला. या मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्याचप्रमाणे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने खीरदान केले जाते आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये जयंतीची मिरवणूक आकर्षक पद्धतीने काढली जाते त्यांचा आदर्श घेऊन इतर राज्यातील लोक देखील अशा मिरवणुका आपल्या राज्यामध्ये काढत असतात त्यामुळेच सोलापूरची आंबेडकर जयंती ची मिरवणूक बघण्यासाठी देशभरातील लोक सोलापुरात येतात आणि ही जयंती संपूर्ण जगभर नंबर वन करण्यामध्ये या सर्व मंडळांचा फार मोठा वाटा आहे
समता बुद्ध विहार न्यू बुधवार पेठ सोलापूर
न्यू बुधवार पेठ सोलापूर या ठिकाणी समता बुद्ध विहाराची स्थापना दिवंगत केरू जाधव यांनी केले असून या विहाराचा विस्तार मोठ्या थाटामाटा मध्ये केला जात आहे आज या ठिकाणी विहाराचे स्वरूप दिव्य भव्य स्वरूपामध्ये निर्माण होण्याच्या मार्गावर आहे दिवंगत केरू जाधव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुमित्रा जाधव आणि त्यांचे सुपुत्र हे प्रयत्नशील आहे समता परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी एकत्र येतात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात वेगवेगळे व्याख्यान आयोजित केले जातात विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक संघशक्तीची भावना या ठिकाणी विकसित केली जाते लहान मुलांवर संस्कार केले जातात महिलांसाठी वेगवेगळे महिला बचत गटाचे कार्यक्रम देखील घेतले जातात
नालंदा बुद्ध विहार सोलापूर
नालंदा बुद्ध विहाराची स्थापना नालंदा नगर मधील ज्येष्ठ उपासक दिवंगत डॉक्टर डी एस कांबळे आणि त्यांच्यासोबत असणारे बौद्ध उपासक आणि उपासीका यांच्या अथक प्रयत्नातून दिव्य आणि भव्य बुद्ध विहाराच्या निर्मितीचे काम या ठिकाणी सुरू आहे उपाशी का अध्यक्ष आम्रपाली गाडे आणि त्यांच्या उपासिका संघ यांना मार्गदर्शन करण्यासाठी समाजभूषण प्राध्यापक अण्णासाहेब भालशंकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली बुद्धविहाराची मजल मोठ्या थाटामाटा मध्ये मोठ्या जोमाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात महिलांमध्ये बचत गट स्थापन करणे महिलांना पर्यटन स्थळांना घेऊन जाणे वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यान आयोजित करणे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना पाचारण करून विचाराची देवाण-घेवाण करणे सामूहिक शक्ती निर्माण करणे या भावनेतून या विहारांमध्ये थायलंड देशांमधून आलेली भव्य दिव्य भगवान बुद्धांची सहा फुटाची मूर्ती ही सर्वांसाठी शांतीचा संदेश देत आहे
भीम विजय तरुण मंडळ संचलित बुद्ध विहार नि बुधवार पेठ सोलापूर
न्यू बुधवार पेठ सोलापूर येथील भीम विजय तरुण मंडळाच्या वतीने दिव्य आणि भव्य बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे या विहारांमध्ये थायलंड मधून आलेली भगवान बुद्धांची सहा फुटाची दिव्य भव्य पंचधातूची मूर्ती आशीर्वाद मुद्रा अवस्थेमधली मूर्ती सर्वांना आकर्षित करते या विहारांमध्ये नित्यनेमाने लहान मुलांवर बाल संस्कार केले जातात नित्यनेमाने वंदना केली जाते मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम या विहारातून बौद्धाचार्य सुमेध डोलारे हे करत आहेत या ठिकाणचे अध्यक्ष अरुण पात्रे सुनील शिवशरण तथा त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते या विहाराच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देत आहेत आणि आज दिव्य आणि भव्य बुद्ध विहार निर्माण करून लेझीम ताफा धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉक्टर आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटा मध्ये साजरी केली जाते
बौद्ध विहारांमधील कार्यक्रम
बुद्ध पूर्णिमा
बुद्ध पूर्णिमा हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. सोलापूरमधील विहारांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
· प्रबुद्ध भारत विहार येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून, सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
· जयभीम बुद्ध विहार (मांडेगाव) येथे १ मे (बुद्ध पौर्णिमा) पासून ५ मे पर्यंत ५ दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला 'संस्कार वर्ग' असे नाव देण्यात आले. यात मुलांना पाली भाषा व मराठी अनुवादाचे प्रशिक्षण दिले गेले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धरुपाला पुष्प वाहून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून आणि बुद्ध वंदनेने करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा शहर जिल्हा शाखा सोलापूर
भारतीय बौद्ध महासभा शहर जिल्हा शाखेच्या वतीने सोलापूर शहराच्या लगत दहिटणे या गावी दिव्य आणि भव्य महाविहार प्रगतीपथावर आहे बौद्ध महासभेचा हा एक सर्वात मोठा प्रोजेक्ट थोड्या दिवसांमध्ये आपल्याला नावारूपाला आलेला दिसेल या बौद्ध महा सभेच्या विहारांमध्ये वेगवेगळे श्रामणे शिबिर बौद्धाचार्य शिबिर उपासिका शिबिर त्याचप्रमाणे बाल संस्कार शिबिर समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर बौद्ध उपासिका संस्कार शिबिर इत्यादी अनेक शिबिर अनेक व्याख्यान या विहारांमध्ये आयोजित केले जातात या विहाराची संकल्पना बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वातून हा संकल्प साकार होत आहे शहर जिल्ह्यामध्ये अनेक बौद्धाचार्य तयार झालेले आहेत बौद्ध उपासिका बौद्धाचार्य तयार झालेले आहेत या कामांमध्ये केंद्रीय शिक्षक अमित गायकवाड शहराची भूमिका अध्यक्ष पदाची भूमिका बजावत आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी अण्णासाहेब वाघमारे मीनाक्षी बनसोडे धम्मरक्षीता कांबळे नागसेन माने केंद्रीय शिक्षिका शारदा गजभिय बाबासाहेब क्षीरसागर अशोक वाघमारे समता सैनिक दलाचे कमांडर गौतम जगताप लंकेश्वर इत्यादी अनेक समता सैनिक दलाचे कार्यकर्ते बौद्धाचार्य बौद्ध उपासक उपासिका तन-मन धनाने श्रद्धायुक्त भावनेने रात्रंदिवस संस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी अविरत कार्य करत आहे सोलापुरात एकूण 500 पेक्षा जास्त बुद्ध विहार असून त्या विहारामधून नित्यनेमाने बौद्ध संस्कार पूजापाठ वंदना घेतली जाते आणि मुलांवर संस्कार करण्याचे काम केले जाते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोलापूरमध्ये अत्यंत भक्तीभावाने साजरी केली जाते.
· सोलापूर रेल्वे मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, सामूहिक 'बुद्ध वंदना' पाठ करण्यात आली. तसेच, "डॉ. अंबेडकर: भारत में सामाजिक न्याय के शिल्पकार" विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
वर्षावास व उपोसथ व्रत
बौद्ध परंपरेत वर्षावास (पावसाळी चातुर्मास) हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात भिक्खू (बौद्ध भिक्षु) एका ठिकाणी स्थिरावून ध्यान-साधना व धम्माचा अभ्यास करतात. विहारांमध्ये या काळात विशेष प्रार्थना, धम्म चर्चा आणि उपोसथ व्रत (उपासक-उपासिकांनी घ्यावयाचे शील) घेण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हा काळ आत्मशुद्धी आणि अधिक सखोल धम्माभ्यासासाठी उपयुक्त असतो. विहारांमध्ये या काळात धम्म गोष्ठी व ध्यान शिबिरांना विशेष महत्त्व असते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन
धम्मचक्र प्रवर्तन दिन (आश्विन शुक्ल पौर्णिमा) हा बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सोलापूरमध्ये लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते.
· सोलापूर शहरात या दिनानिमित्त सुमारे २५ मंडळांच्या सहभागातून शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लेझीम, बुद्ध वंदना आणि शांततेचा संदेश दिला गेला.
· मिरवणुकीत तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचा मनोहारी देखावा सादर करण्यात आला. हजारो कार्यकर्त्यांनी गणवेशामध्ये लेझीमचा बहारदार खेळ सादर केला.
इतर महापुरुषांचे कार्यक्रम
बौद्ध विहारांमध्ये केवळ धार्मिक सणच नव्हे, तर इतर महापुरुषांचे कार्यक्रमही साजरे केले जातात.
· मीराताई आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून) यांचा वाढदिवस विहारांमध्ये केक कापून व मुलांना वाटप करून साजरा करण्यात येतो.
· माता रमाई आंबेडकर यांची जयंती देखील उत्साहात साजरी केली जाते.
· नूतन नगरसेवक/नगरसेविका यांचा सत्कार कार्यक्रमही विहारांमध्ये आयोजित केला जातो, ज्यामुळे समाजातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित केले जाते.
निष्कर्ष
सोलापूर शहरातील बौद्ध विहार ही केवळ धार्मिक स्थळे नसून, ती सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याची केंद्रे आहेत. अस्थि विहारापासून ते नालंदा नगर बुद्ध विहारापर्यंत, प्रत्येक विहाराचा स्वतःचा ऐतिहासिक वारसा आहे. येथील विविध सण, कार्यक्रम आणि उपक्रम समाजात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व प्रबोधनाच्या विचारांना जिवंत ठेवतात. विहारांच्या व्यवस्थापनासह सर्व स्तरातील सहभाग या विहारांना समाजाचे केंद्रबिंदू बनवतो.
Comments
Post a Comment