संविधान मुळे राष्ट्र अखंड आहे डॉ. संघप्रकाश दुड्डे
संविधान मुळे राष्ट्र अखंड आहे डॉ. संघप्रकाश दुड्डे
सोलापूर- संगमेश्वर कॉलेज सोलापूर (स्वायता) समान संधी केंद्र राष्ट्रीय सेवा योजना विभाग समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर रोजी संगमेश्वर महाविद्यालय येथे निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी राहुल काटकर-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रणिती सोनकांबळे प्रोजेक्ट अधिकारी बार्टी, अश्विनी सुपाते-समतादूत, उमेश पुजारी उपचार प्राचार्य प्राध्यापक डॉ. डी एम मैत्री, समान संधी समन्वयक प्राध्यापक डॉ. संघप्रकाश दुड्डे डॉ. के.डी गायकवाड मॅडम, NSS प्रमुख. डॉ अण्णाप्पा साहेब साखरे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार उपप्राचार्य डी.एम मैत्री यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. अण्णाप्पा साखरे यांनी केले पाहुण्यांचा परिचय ओम गुंड यांनी करून दिला. यावेळी बोलताना डॉ. संघप्रकाश दुड्डे म्हणाले की.. भारतीय संविधान यामुळे राष्ट्र अखंड आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन अखंड परिश्रम करून भारतीय संविधानाची निर्मिती केली यामध्ये प्रत्येकाला अधिकार दिले गेले विषमता नष्ट करण्यात आले समानता बंधुत्व अन्याय विचार स्वतंत्र ही भारतीय संविधानाची मूळ तत्वे आहेत.
यावेळी डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे, मौलिक अधिकार, मार्गदर्शक तत्वे, संविधानातील विविध कलमांचा सविस्तरपणे उलघडा केला प्रत्येक कलम समजावून सांगितले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली प्रथम क्रमांक प्रणाली नन्नवरे, द्वितीय क्रमांक मुकेश राठोड, तृतीय क्रमांक सुदर्शन गायकवाड, निबंध स्पर्धेत मराठी- प्रथम अस्मिता काशिनाथ खट्टे, दुतीय सुदर्शन सतिश गायकवाड, तृतीय पृथ्वीराज दत्तात्रय राठोड, हिंदी निबंध स्पर्धेत - ज्योती संगप्पा इंगळे, द्वितीय प्रज्ञा अनन्यम मैरुले, तृतीय संघमिता कचरू हच्चे, इंग्रजी निबंध स्पर्धेत- मुकेश राठोड, दुतीय वैजयंती जयंती शिवशरण, तृतीय श्री गण हर्ष श्रीमंत, कन्नड निबंध स्पर्धेत प्रथम भाग्यश्री बिराजदार , द्वितीय मलकाप्पा कुलुगेरे, तृतीय अंबिका बंडगर यांनी यश संपादन केले. यावेळी डॉ संतोष मिटकरी प्रा. शहानूर शेख, डॉ श्रीदेवी पाटील, डॉ. के. डी गायकवाड मॅडम , खानापुरे सी. जी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल फताटे, रोहन घोरलेवाले, वंशिका व्यवहारे, प्रज्योत शिरसट, ज्योती इंगळे, अनिकेत जानराव, ज्योती वाघमारे, सिंधूज्या सर्वगोड, यांनी परिश्रम केले संचालन कु गंगा वाले यांनी केले आभार वैष्णवी कुलकर्णी यांनी मानले यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते

Comments
Post a Comment