धम्मभूमि गुगवाड लोकार्पण 12 नोव्हे 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीने इथल्या प्रत्येकात बौध्द धम्माबद्दलची आस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात गुगवाड (ता.जत) येथे भव्य-दिव्य असा “धम्मभूमी” चा लोकार्पण सोहळा देशभरातील भिख्खू गण, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक तसेच बौद्ध, समाजातील धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या धम्मभूमी लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वत्र बुद्धमय वातावरण पाहायला मिळत आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील गुगवाड सारख्या ग्रामीण भागात सुमारे वीस एकर क्षेत्रामध्ये प्रतिथयश उद्योजक सी.आर. सांगलीकर यांच्या माध्यमातून ही भव्य – दिव्य धम्मभूमी उभारण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे “धम्मभूमी विहार” म्हणून याची गणना होणार असून या धम्मभूमीचा लोकार्पण सोहळा भदंत बोधीपालो महाथेरो लोकोत्तर महावीर चौका आणि भिक्षुक संघ यांच्या हस्ते पार पडला आहे.

या सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. या धम्मभूमीवर आता बुद्ध विहार, भिक्कू ट्रेनिंग सेंटर, लायब्ररी, यूपीएससी, एमपीएससी ट्रेनिंग सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहेत. बुद्ध विहाराची इमारत 100 × 100 ft अशी दोन मजली उंच आणि 40 × 40 ft अशा आकाराची ही इमारत असून या ठिकाणी थायलंड वरून बारा फूट उंचीची पंचधातूच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बौद्ध समाजासाठी आणि तरुण पिढीला ही धम्मभूमी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी बौद्ध समाजातील भदंत भिक्कु यांनी व्यक्त केला आहे.

या धम्मभूमीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रतिथयश उद्योगपती सी.आर. सांगलीकर, जगभरातील भंतेजी महाथेरोजी आणि संपूर्ण भिख्खू गण, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक तसेच बौद्ध, समाजातील धार्मिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

काल के आधार पर वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए?

हिंदी भाषा ही जन-जन को जोड़ने वाली भाषा है -डॉ देवराव मुंडे ( हिंदी पखवाड़ा प्रतियोगिता पुरस्कार वितरण समारोह संगमेश्वर कॉलेज तथा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय MOUअंतर्गत समारोह 2025)

10 New criteria of NAAC and its specialties - Dr. Sangprakash Dudde, Sangameshwar College Solapur