मराठी राज भाषा दिन संगमेश्वर कॉलेज सोलापुर

  मराठी भाषा दिन है उस संदर्भ में में सभी मराठी भाषा बोलने वाले  सभी भाई और बहनों को शुभकामनाएं  सभी भाइयों के प्रति अपनी आस्था प्रकट करता हूं जो लोग मराठी भाषा बोलते हैं साथ ही साथ सभी देशवासियों को मैं अपनी भावनाये  प्रकट करता हूं  
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना  संगमेश्वरमध्ये अभिवादन
 सोलापूर (दिनांक २७)  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त व संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संयुक्त अभिवादनाचा कार्यक्रम कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी कविश्रेष्ठ  कुसुमाग्रज आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली . पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुहास पुजारी , प्राचार्य एस. जे. आवटे डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ.महादेव देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. अभिवादनानंतर प्रा.डॉ. सुहास पुजारी यांनी मराठी विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना कर्मयोगी आप्पासाहेब यांच्या कार्याचा परिचय देत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्ती द्वारे विद्यार्थ्यांसमोर पुस्तकांचे भावविश्व उलगडले. कॉलेजच्या वतीने बाबूराव मैंदर्गीकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मैंदर्गीकर  यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. अमोल कोटगोंडे,सुयश कविटकर  यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले तर ऋतिक कुर्ले  यांनी आभार मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य डी. एम. मेत्री डॉ. राजकुमार मोहरकर. प्रा.श्रीनिवास भंडारी, प्रा.रेवणसिद्ध हालोळी , प्रा. मुस्तफा मकानदार, प्रा. शिवाजी मस्के, प्रा.पी. एस. बनसोडे यांच्यासह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

10 New criteria of NAAC and its specialties - Dr. Sangprakash Dudde, Sangameshwar College Solapur

जन संचार की परिभाषा ,स्वरूप,-डॉ संघप्रकाश दुड्डेहिंदी विभाग प्रमुख,संगमेश्वर कॉलेज सोलापुर (मायनर हिंदी)

काल के आधार पर वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए?