मन हेच प्रधान -बुद्ध संदेश

गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल".

 थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." 
  मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."
    गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे."

 🌷"आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत,
  ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."

Comments

Popular posts from this blog

काल के आधार पर वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए?

10 New criteria of NAAC and its specialties - Dr. Sangprakash Dudde, Sangameshwar College Solapur

जन संचार की परिभाषा ,स्वरूप,-डॉ संघप्रकाश दुड्डेहिंदी विभाग प्रमुख,संगमेश्वर कॉलेज सोलापुर (मायनर हिंदी)