धम्म उपासक एस पी कडलक अभिवादन
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट कार्यकर्ते एस पि कड़लक यांचे दुखद निधन. ---------------------------------------- भिमा कोरेगाव दि 04 मार्च 2020. (रामदास लोखंडे ) ऐतिहासिक भिमा कोरेगाव विजयस्तंभ ( पुणे )येथिल आंबेडकरी चळवळीतीलज्येष्ट कार्यकर्ते शंकर पुंडलिक कड़लक वय 82 वर्षे यांचे आज दिनांक 04/03/2020 रोजी कल्यान मुंबई येथे दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज राञी 10 वाजता भिमा कोरेगाव येथे करण्यात येणार आहे. त्यांचा जन्म 4 एप्रिल 1938 साली भिमा कोरेगाव ता.शिरूर जिल्हा पुणे येथे झाला.त्यांचे वड़िल हे रेल्वे सेवेत कार्यरत होते. कड़लक अप्पा हे बालवयापासुनच खुप हुशार होते. ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिक्षण घेतले.त्याच दरम्यान कड़लक अप्पा रेल्वे सेवेत कामाला लागले. तिकिट चेकर Tc म्हणुन त्यांनी रेल्वे सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविला.1जानेवारी 1818 रोजी भिमा कोरेगाव येथे 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा खात्मा करून जुलमी पेशवाईचा पराभव केला.1जानेवारी रोजी आपल्या पुर्वजांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकर हे भिमा कोरेगाव विजयस्तंभ येथे येत असत.1 जानेवारी रोजी देशातुन लाखो भिमसैनिक भिमा कोरेगाव येथे येतात या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून व या शौर्य भुमित आपला वारसा जतन करण्याचे काम व बौद्ध धम्माचा प्रचार करण्याचे काम अप्पांनी केले.ते धम्ममिञ होते. अप्पांनी पुढाकार घेऊन भिमा कोरेगाव येथे तिसरी धम्मक्रांती स्मृती बुध्द विहाराची उभारणी केली. या बुध्द विहाराचे उदघाटन व बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापना दिनांक 28/10/2007 रोजी धम्मचारी लोकमिञ यांच्या हस्ते केले. व धम्माचा प्रचाराचे काम केले.ते दैनिक सम्राटचे नियमित वाचक होते. तसेच ते सम्राटचे स्तंभलेखक होते. आंबेडकरी चळवळीला जागे करण्याचे कार्य सम्राट करत असुन दैनिक सम्राट ऐतिहासिक भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य भुमिचा शौर्याचा वारसा जतन करून समाजाला जागे करण्याचे काम दैनिक सम्राटचे संपादक बबनराव कांबळे हे करत आहेत असे ते नेहमिच म्हणत असत.ऐतिहासिक भिमा कोरेगाव विजयस्तंभ येथिल जागेवर रखवालदार माळवतदार कुटुंबियांनी केलेल्या अतिक्रमणाविरूध्द सर्वप्रथम मि दैनिक सम्राट मधुन दिनांक 23 ड़िसेबर 2009 रोजी वाचा फोड़ली यावेळी कड़लक अप्पांनी मला भिमा कोरेगाव येथे बोलुन माझे अभिनंदन केले होते. सणसवाड़ी नांलदा बुध्द विहाराचे संस्थापक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुदामराव पवार, व शुरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज बौद्धाचार्य के के गायकवाड यांचे ते मिञ होते. यांच्या सोबत नेहमीच आंबेडकरी चळवळ व बौद्ध धम्माचा प्रचार या विषयी. चर्चा होत असत.ते नांलदा बुध्द विहार सणसवाड़ी येथील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असत.दैनिक सम्राटाने भिमा कोरेगाव विजयस्तंभ, शुरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचा शौर्याचा वारसा जोपासला असल्यामुळे कड़लक अप्पांनी त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त दैनिक सम्राट कार्यलय मुंबई येथे भेट देवुन दैनिक सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांचे अभिनंदन करून सम्राटला 80 हजार रुपये दान दिले.व सम्राट टिकला पाहिजे म्हणुन बळ दिले.ते स्वता लेखक होते. अन्याय अत्याचार विरुद्ध ते नेहमिच आवाज उठवत असत.भारतिय संविधानाला मनु रूनी धर्मांध जातिव्ध्यानी वामनानी विळखा घातल्याचे ते बोलत असत.त्याचे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.बौद्ध बांधवानी बौद्ध स्थळांना भेटी देऊन आपला ईतिहास अभ्यासावा म्हणून ते अल्प दरात देशात बौद्ध धम्म सहल आयोजित करत असत.भिमा कोरेगाव परिसरात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून त्यांची तळमळ होती.ते नेहमिच भिमा कोरेगाव विजयस्तंभ या विषयांवर मला मार्गदर्शन करत व लढण्यासाठी प्रेरित करत. त्यांचा सहवास मला लाभला.दि 03 /03/2020 रोजी भिमा कोरेगाव वरून मुंबई ला कामानिमित्त गेले.आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कल्याण येथे रूगनालयात भरती करण्यात आले होते. परंतु सकाळी 11 वाजता त्यांचे निधन झाले. या परिसरात अप्पांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीला मोठा आघात झाला असुन त्यांचे कार्य, विचार आम्हाला प्रेरणा देईल अप्पांच्या स्मृतीस दैनिक सम्राट परिवार ,नांलदा बुध्द विहार सणसवाड़ी,शिल्पकार तरूण मंड़ळ भिमा कोरेगाव ,भारतिय बौद्ध महासभा शाखा विजयस्तभ व या परिसरातिल आंबेडकरी समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन. #रामदास लोखंडे #भिमा कोरेगाव पुणे.
Comments
Post a Comment