साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील बंडखोर नायक ' वक्ते प्रा डॉ संघप्रकाश दुड्डे

*' साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील बंडखोर नायक ' वक्ते प्रा डॉ संघप्रकाश दुड्डे हे वर्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. याचे औचित्य साधून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जन्मशताब्दी महोत्सव समिती, शहर जिल्हा सोलापूर ने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपासून वर्षभर दर रविवारी सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह व्याख्यानां चे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेतील चौथी पुष्प आज माननीय प्रा.संघप्रकाश दुड्डे यांनी गुंफले. प्रथमता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती जन्मशताब्दी महोत्सव समिती च्या कार्यालयामध्ये मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश आप्पा पाटोळे, माननीय स्वातीताई आवळे (नगरसेविका सोलापूर महानगरपालिका), माननीय समाधान आवळे, माननीय श्री. विजय अडसुळे, माननीय श्री. शिवाजी गायकवाड, माननीय श्री बालाजी घोडके, प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री टी. एस. क्षीरसागर सर , माननीय श्री किशोर जाधव, यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास...